सोलापुरात चुरशीने मतदान
पदवीधरसाठी ७१ टक्के तर शिक्षकांसाठी ८९ टक्के मतदान
सोलापूर : (प्रतिनिधी ) दि. 23 :- विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारासंघाठी सोलापूर जिल्ह्यातून ७१.६ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातून ८९ टक्के चुरशीने मतदान झाले. पदवीधरसाठी ११७ तर शिक्षक मतदार संघासाठी ७६ असे एकूण १९३ मतदान केंद्रावर शुक्रवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते सांयकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रकीया ही शांततेत पार पडली असून, रात्री उशिरा मतपेट्या मतमोजणीसाठी पुणेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिली.
पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ४९ हजार ७२२ नोंदणी केली होती. यातील ३५ हजार ५९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शिक्षक मतदार संघासाठी १५ हजार ३०३ मतदारांनी मतदारांनी नोंदणी केली होती. यात १३ हजार ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी आठ ते सकाळी दहा या पहिल्या दोन तासात पदवीधर मतदारसंघासाठी ८.७२ टक्के म्हणजे ४३३४ मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी ११.४८ टक्के म्हणजे १७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी २४.०२ टक्के म्हणजे ११९४५ मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी २९.६७ टक्के म्हणजे ४५४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दोन वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी ४५.२१ टक्के म्हणजे २२४७७ मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी ५८.८३ टक्के म्हणजे ९००३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तर सकाळी नऊ वाजण्याच्या सूमारास जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सिद्धेश्वर प्रशाला आणि नॉर्थकोट येथील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा, मतदारांसाठी स्पिप वाटपाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे मतदारांना विना व्यत्यय मतदान करण्यासाठी मदत झाली.
पदवीधरसाठी तालुकानिहाय एकूण मतदार संख्या, झालेले मतदान आणि कंसात टक्केवार.
बार्शी – ३९९९ – ३३९९ (८५), अक्कलकोट-२०२६-१७१२ (८४.५), मंगळवेढा-२३९५-१८६५ (७७.०९), माळशिरस – ७४१७-५४८६ (७४), सांगोला-४२७१-३०३३ (७२.७), पंढरपूर -६२८७-४५२९ (७२), मोहोळ -३९४६-२७९६ (७०.०९), दक्षिण सोलापुर-१६७८-११६८ (६९.६), माढा-४८०२-३१८० (६६.०२), करमाळा- ३२६८-२१३४ (६५.०३), उत्तर सोलापुर- ९७३३-६२८९ (६४.०६), एकुण -४९७२२-३५५९१ (७१.६)
यंदा मतदानाचा टक्क वाढला.
यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचा पाहायला मिळाला. सन २०२० मध्ये झालेल्या पदवीधर मतदार संघासाठी ५३ हजार ८१३ पैकी ३३ हजार ५२० म्हणजे ६२.२९ टक्के मतदान झाला होता. यंदा ४९ हजार ७२२ पैकी ३५ हजार ५९१ मतदारांनी म्हणजे ७१.६ टक्के मतदान झाला. तर सन २०२० मध्ये शिक्षक मतदार संघासाठी १३ हजार ५८४ पैकी ११ हजार ५५८ मतदारांनी म्हणजे ८५.०९ टक्के मतदान झाले होते. यंदा शिक्षक मतदार संघासाठी १५ हजार ३०३ मतदारांपैकी १३ हजार ६१८ मतदार म्हणजे ८९ टक्के मतदान झाला.








