Edition

ओ साहेब, ऑनलाईन गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अन्नधान्य वितरण विभाग ॲक्शन मोडवर


सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे शहरातील गॅस धारकांच्या ऑनलाइन बुकिंग करून ही गॅस मिळत नसल्याबाबतच्या वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने ओंकार पडोळे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तात्काळ पथक नेमूण सोलापूर शहरातील देविका गॅस एजन्सी,भारती विद्यापीठ जुळे सोलापूर, स्वामी समर्थ गॅस एजन्सी, गिरीधर गॅस एजन्सी ह्या तीनही गॅस एजन्सीना भेट दिली असता, गॅस धारकांकडून नंबर लावून ही गॅस मिळत नसल्याचे तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना वाटपा संदर्भात माहिती घेऊन गॅस सुरळीत पुरवठा करण्यास सूचना देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आव्हानानुसार कोणत्याही गॅस एजन्सीने गोडाऊनच्या बाहेर गॅसधारकांचे रांगा लावून देऊ नये, त्यांना घरपोच गॅस देण्या संदर्भात सर्वांना सक्त सूचना संबंधिताना देण्यात आले आहे.
ह्यावेळी अन्न धान्य वितरण कार्यालय अंतर्गत असलेले नंदकिशोर ढोके परिमंडळ अधिकारी अ विभाग, गीता डंके निरीक्षण अधिकारी अ विभाग, राजेश यमपुरे प्र.परिमंडळ अधिकारी ब विभाग, ज्ञानेश्वर काशीद पुरवठा निरीक्षण अधिकारी ब विभाग, प्रफुल्ल नाईक परिमंडळ अधिकारी क व ड विभाग, सज्जन भोसले पुरवठा निरीक्षण अधिकारी ड विभाग, रवी साळुंखे, वैभव मोरे,आनंद मदने, सचिन लांडे सहाय्यक पुरवठा कर्मचारी पुरवठा असे सर्व परिमंडळ अधिकारी व कर्मचारी यानी ही मोहीम यशस्वी रित्या पार पाडली.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!