हम भी भीमसैनिक है इसलिये हम भीम के दिवाने है
ताज सोशल ग्रुपच्या वतीने भीमसैनिकांसाठी पाणपोईचे नियोजन”पोलीस निरीक्षकांच्या हस्ते उद्घाटन..!
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही वर्षी ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून फॉरेस्ट भाजी मार्केट जवळ पाणपोईचे नियोजन करण्यात येत असते” दरम्यान यंदाच्या ही वर्षी महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ताज सोशल ग्रुपच्या वतीने पाणपोईचे नियोजन करण्यात आले होते” याचे शुभारंभ प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेची पूजन करून सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले” यावेळी माझी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक तोफिक शेख पैलवान, फॉरेस्टचे जमीर पुढारी, कांबळे, शिवशरण, महेश गायकवाड, आसिफ राजे, फैयाज कलवल, अश्फाक शेख, अल्फता शेख, जुबेर इनामदार, जुनेद शेख, अखिल नाईकवाडी, रिजवान शेख, बल्लार, अदनान शेख, रिजवान मुल्ला, आसिफ हुंडेकरी, इनामदार छत्री, अमीन तरेकरी यासह ताज सोशल ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते” यावेळी तोफिक शेख पैलवान बोलताना म्हणाले की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे अवचित साधून आम्ही ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून गेल्या 20 ते 25 वर्षापासून पाणपोळीचे नियोजन करतो” या पाणपोईचे नियोजन करण्यामागचे हेतू हे फक्त भीम सैनिकांची सेवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार आपल्या मनात रुजावे त्यांनी लिहिलेली घटना व त्यांनी केलेले कार्य कोणालाच पुसता येत नाही असे यावेळी तोफिक शेख पैलवान म्हणाले.









