Edition

परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके करतात दुकानदाराकडून जबरदस्ती मंथली वसूल.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके करतात दुकानदाराकडून जबरदस्ती मंथली वसूल.

 

प्रशासनाकडून पुरवठा विभागाचे पारदर्शकता येण्याकरिता अनेक योजना राबवित असताना मात्र अन्नधान्य वितरण कार्यालय सोलापूर अंतर्गत असलेल्या परिमंडळ अधिकारी अ विभागातील नंदकिशोर ढोके हे रेशन दुकानदाराकडून जबरदस्ती मंथली वसुली करत असल्याबाबतची तक्रार आता रेशन दुकानदारांनीच केले असल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.

परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके हे दुकानदाराकडून राजरोस पणे जबरदस्ती मंथली वसुली करत असल्याचे तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाले असल्यामुळे अविभाग संघटनेच्या वतीने अन्नधान्य धान्य वितरण अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आले .प्रशासनाच्या वतीने विनाआधार व ई केवायसी सारख्या योजने च्या माध्यमातून अनेक कार्ड रद्द झाल्याने रेशन दुकानदारांच्या कोठ्यात कमालीचे कपात झाले असताना त्या धर्तीवर दुकानदारांचे कमिशन मध्ये कपात झाले आहे.दुकानदारांना दुकान भाडे,लाईट बिल, कामगार पगार, पेट्रोल कौटुंबिक उदरनिर्वाहसाठी पैसे कमी पडत असताना अशा भ्रष्ट अधिकाऱ्याकडून नाहक मानसिक त्रास देऊन जबरदस्तीने मंत्री वसुली होत असल्याने दुकानदार मेथाकुटीस आलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मंथली द्यावी की घर चालवावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे,तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा लवकरच सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने पुनम गेट जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देत असल्याचे म्हटले गेले आहे. निवेदन देताना सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख,राजशेखर जावळे अ झोन अध्यक्ष अभिजीत सडडो,जिल्हाप्रमुख नितीन पेंटर सह बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते.आता अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे हे अश्या भ्रष्ट अधिकारी ह्यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्व दुकानदाराचे लक्ष वेधून आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!