जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार.
सोलापूर, दि. 29 (प्रतिनिधी): — महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण होणार आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विहित वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.









