Edition

सोलापूर डाग बंगला स्वागत कक्षामध्ये चालते मद्य पार्टी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

येथील डाक बंगला स्वागत चक्क दारू अड्डा बनला आहे.

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर डाक बंगला म्हणजे एक शासकीय विश्राम गृह या बाबत  प्राचार्य राजू प्याटी यांना एक तक्रारी फोन आल्यानंतर प्राचार्य राजू प्याटी हे विचारणा करण्यासाठी गेले असता भलतेच संतापजनक प्रकार उघडकीस आला.

चक्क स्वागत कक्षात बसुन दारू पीत बसलेले अधिकारी कर्मचारी दिसले. त्या मुळे मुळ तक्रार बाजूला राहिले कारण येथील कामावरील कर्मचारी पळ काढून गेले. आज कामावर कोण याची माहिती उद्या उपलब्ध होईल.

विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभाग कडे येते आणि तीथे जे ज्युनिअर इंजिनिअर स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असल्या प्रमाणे राहतात व प्रोटोकॉल प्रमाणे पत्रव्यवहार केलेल्या वरिष्ठ अधिकारी यांना रुम न देणे मिटिंग हॉल न देणे असे कृत्य सुरू आहे. अशी तक्रार प्राप्त झाले म्हणून प्राचार्य राजू प्याटी गेले असता वरिल गंभीर प्रकार समोर आला. हि बाब गंभीर असून तातडीने जिल्हाधिकारी प्रोटोकॉल विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्राचार्य राजू प्याटी यांनी केले आहे.

सदर घटने बाबत जिल्हाधिकारी साहेबांना रितसर निवेदन सोमवारी देणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्राचार्य राजू प्याटी.

सामाजिक कार्यकर्ता

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!