Edition

स्व. राजेश कोठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतल्या वडिलांच्या मित्रांच्या भेटी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्व. राजेश कोठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतल्या वडिलांच्या मित्रांच्या भेटी

 

सोलापूर : (प्रतिनिधी) दि. 13. आपले वडील स्व. राजेश कोठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी राजेश कोठे यांचे १० वी च्या बॅच मधील मित्र परिवाराच्या भेटी घेतल्या.

 

स्व. राजेश कोठे यांचा मोठा मित्र परिवार आहे. १९८२ सालच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या या बॅचमधील त्यांचे अनेक मित्र आज सोलापूर शहरात विविध क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योग, विधी, व्यापार, शैक्षणिक, अभिनय, कला अशा अनेक क्षेत्रात ते शहर विकासात योगदान देत आहेत. वडिलांच्या या मित्रांच्या सोलापूर शहराच्या विकासासाठी असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी आपले वडील स्व. राजेश कोठे मित्र परिवाराच्या भेटी घेतल्या.

 

यावेळी स्व. राजेश कोठे मित्र परिवारातील सदस्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या शहर विकासाच्या धडाडीचे कौतुक केले. वर्षानुवर्षे रखडलेला बी टू सारखा अत्यंत क्लिष्ट आणि तितकाच अवघड विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवला. त्याबद्दल मित्र परिवाराने आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. तसेच शहर पाणीपुरवठ्यासाठीची १ हजार ३७८ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना, विमानसेवा, उड्डाणपूल, आयटी पार्क, सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक शहर विकासाला मोठी गती देणाऱ्या प्रकल्पांच्या मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी हिरहिरीने पुढाकार घेऊन मोलाचा वाटा उचलल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचे यावेळी या मान्यवरांनी अभिनंदन केले.

राजेश कोठे मित्र परिवाराने केले बी टू सह केले शहर विकासाच्या धडाडीचे कौतुक.

 

याप्रसंगी विक्रम देशमुख, प्रियदर्शन शहा,डॉ. अतुल कुलकर्णी, राजेश पटवर्धन, संजीव पाटील, अविनाश ठेंगील, सूर्यकांत नवगिरे, डॉ. असित मेहता, बाळासाहेब ठेंगील, सुनिल पतकी, अमोल चाफळकर, ऍड. आनंद देशपांडे, अशोक सुरतवाला, संजय सुरवसे, सुर्यकांत नवगिरे, अमोल चितळे, प्रमोद जोशी, अनंत खजिनदार, धनंजय काडगावकर, मिलिंद शहा आदी उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!