वडार समाजाला जात प्रमाणपत्रासाठीचे विशेष शिबिर उत्साहात.
सोलापूर : दि. 17. (प्रतिनिधी) :- वडार समाजाला शासकीय जात प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे आयोजित विशेष शिबीर माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथे उत्साहात झाले. भटके विमुक्त विकास परिषदेचे संघटन मंत्री राहुल चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष उद्धव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह सी. ए. ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हा व शासकीय सदस्य व अभियान प्रमुख सुनील पवार, दक्षिण सोलापूर तालुका कार्यवाह कैलास चौधरी, संजय राठोड, महादेव कोटकर, श्रीशैल होनमाने, दक्षिण सोलापूर तालुका संयोजक मशप्पा कोळी, सहसंयोजक यल्लाप्पा बंदपट्टे आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून ६२ जणांना विविध प्रजातींचे दाखले काढून देण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गणेश सोनटक्के, दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार विष्णू बुट्टे यांचे विशेष सहकार्य लाभले.









