Edition

भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर च्या वतीने १३६ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे एसआरपी कॅम्प, सोरेगाव, सोलापूर येथे आयोजन!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

१३६ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण!

 एसआरपी कॅम्प, सोरेगाव, सोलापूर

कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर १३६ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे एसआरपी जवानांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील एसआरपी कॅम्प येथे सामूहिकरित्या श्रवण केले.

यावेळी कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांना विनम्र अभिवादन केले तसेच राष्ट्रसेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या. आपल्या सैनिकांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा हे प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

तसेच आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून कारगिलच्या वीर जवानांच्या शौर्याला वंदन करत त्यांच्या पराक्रमाचे स्मरण केले. याचबरोबर आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा संवाद प्रेरणादायी ठरला.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!