Edition

हरीभाई देवकरण प्रशालेचे २१६ माजी विद्यार्थी २५ वर्षांनंतर देश विदेशातून आले एकत्र.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हरीभाई देवकरण प्रशालेचे २१६ माजी विद्यार्थी २५ वर्षांनंतर देश विदेशातून आले एकत्र.

शाळेला शैक्षणिक तसेच क्रीडा साहित्याची दिली भेट.

सोलापूर : प्रतिनिधी

हरिभाई देवकरण प्रशालेच्या २००१ च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षानंतर देश विदेशातून एकत्र येत शाळेत स्नेहमिलन केले. तसेच शाळेला शैक्षणिक, क्रीडा साहित्याची भेट देखील दिली.

हरीभाई देवकरण प्रशालेच्या २००१ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा २५ वा रियुनियन सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात आणि भावनिक वातावरणात झाला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष सुरेशबाबू मंकणी, मुख्याध्यापक पी. आर. कांबळे, माजी मुख्याध्यापिका कांगुने तसेच शाळेतील माजी व विद्यमान शिक्षकांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी जमलेल्या २१६ माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकमेकांची तसेच शिक्षकांची भेट घेत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. परदेशात असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात ऑनलाइनदेखील सहभाग घेतला.

शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००१ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी हरिभाई देवकरण शाळेकरीता ७५ इंची इंटरऍक्टिव्ह पॅनल, सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट बॅट या वस्तू भेट स्वरूपात दिल्या. यावेळी मंदार कुंदरगी, गौरव बेंद्रे, राहुल डांगरे, अंबादास करगुळे, विवेक खरटमल, कोमल तांबेकर, अबोली सगरे, राधिका नवले, आश्लेषा शेंडगे, योगेश डांगरे, युवराज पवार, युवराज कोष्टी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!