Edition

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा ॲक्शन मोडवर, घरगुतीगॅसचा अवैध वापर करणाऱ्याचे धाबे दणाणले.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा ॲक्शन मोडवर

घरगुतीगॅसचा अवैध वापर करणाऱ्याचे धाबे दणाणले

आखाती युद्धच्या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वासह आसार मैदान (सावरकर मैदान) येथील चौपाटी किल्ला बागेच्या बाजूस चायनीज गाड्या व पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या ह्यावेळी नऊ घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी अवैधरित्या वापरत असल्याचे दिसून आल्यावर पथका समक्ष जप्त करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.
या पथकात परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यमपुरे, परिमंडळ अधिकारी अ विभाग नंदकिशोर डोके परिमंडळ अधिकारी ड विभाग प्रफुल नाईक पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, गीता डंके लिपिक वैभव मोरे, सचिन लांडे,आनंद मधणे तसेच पोलीस प्रशासनातून पोलीस अंमलदार जावेद जमादार,आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदी उपस्थित होते.

ओंकार पडोळे

अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर

प्रशासनाच्या आपत्कालीन हेल्प लाईनवर चार दिवसात गॅस एजन्सी बाबतीत ४० तक्रारी प्राप्त तर दुसरीकडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांनी घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यावसायिक वापर करणाऱ्या वर धडक मोहिमेची कारवाई हाती घेतली आहे.सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुजू होताच नागरिकांनी सध्या सोलापूर शहरातील गॅस एजन्सी बाबतीतची तक्रारीचा पाढा वाचला. त्या धर्तीवर जिल्हाधिकारी ह्यांनी नागरिकांना इतर तक्रारी सोबतच ई केवायसी बाबतीतही मार्गदर्शन केले असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!