Edition

अरुण श्रीरंग ढावरे, माजी शिक्षणाधिकारी पुणे यांचे अल्पशा आजाराने निधन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुखः निधन.

श्री. अरुण श्रीरंग ढावरे, माजी शिक्षणाधिकारी पुणे यांचे दिनांक ३०/०५/२०२६ रोजी तळेगाव दाभाडे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा आहे त्यांचे मुळगाव सिध्दापूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील असून वडील लक्ष्मी विष्णू मील मध्ये नोकरी करत असल्याने त्यांचा जन्म शालेय शिक्षण व महाविद्यालय शिक्षण सोलापूर येथेच झाले. लक्ष्मी विष्णू चाळ देगाव रोड, येथे त्यांचे वास्तव्य होते.एम.ए.बी.एड शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून काम केले व नंतर शासकीय नोकरी. डी.एड कॉलेज, पनवेल येथे प्रथम नियुक्त झाले त्यानंतर प्रशासनामध्ये गट शिक्षणधिकारी म्हणून मावळ, श्रीवर्धन मुरुड जंजीरा, म्हसळा व जुन्नर येथे कार्यरत होते. पुणे येथे एस.सी.आर.टी `मधुन सेवानिवृत्त झाले.

त्यांचा मुलगा अविनाश अरुण या नावाने सिने दिगदर्शक व सिने ऑटोग्राफर म्हणून काम करत असून मराठी पिक्चर किल्ला हा त्याचा पहिला चित्रपटास राष्ट्रपती अवार्ड मिळाले आहे. सीने ऑटोग्राफीमध्ये मसान, कारवा, दृष्यम, मदारी व हिचकी हे हिंदी चित्रपट केले आहे.

हिंदी चित्रपट दिगदर्शनमध्ये “श्री ऑफ अस व पाताळलोक वेब सिरींज “याला film Fare Award ने सन्मानीत केले आहे. सध्या खा. उज्वल निकम यांचे जीवन चरीत्रावर Biopic चे चित्रपटाचे दिगदर्शन करत असून लवकरच तो चित्रपट प्रदर्शीत होत आहे. तसेच राजकुमार हिराणी यांचे सोबत एक वेब चित्रपट करत आहे.

त्यांचा जलदान विधी व शोकसभा दिनांक ०१/०७/२०२६ रोजी तळेगाव, पुणे येथे संपन्न झाला असून त्या कार्यक्रमास माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख साहेब, सर्जेराव जाधव साहेब, मराठे साहेब व इतर सर्व सहकारी मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते.

अरुण ढावरे हे मरवडे ता. मंगळवेढा गांवचे भाच्चे जावई असून सुरेश शिवशरण माजी सहसंचालक खादी ग्रामोद्योग आयोग यांचे मोठे मेव्हणे असून मंगळवेढाचे पंकज ढावरे, यंत्र अभियंता, राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे चलुते आहे.

“भावपुर्ण श्रध्दांजली “

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!