दुःखद वार्ता
ज्येष्ठ मातोश्री नागर शंकर शिराळकर यांचे निधन
सोलापूर : दैनिक शिव निर्णयचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल शिराळकर यांच्या मातोश्री श्रीमती नागर शंकर शिराळकर (वय 90 वर्षे) यांचे शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.
श्रीमती शिराळकर या अत्यंत प्रेमळ, कर्तव्यदक्ष व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबातील सर्व सदस्यांना संस्कार, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली. त्यांच्या निधनाने शिराळकर कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा दैनिक शिव निर्णयचे संपादक अनिल शिराळकर, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्यावर रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता रूपाभवानी लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रीमती नागर शंकर शिराळकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
“ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो व शिराळकर परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो.” 🙏









