Edition

पालकमंत्री यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्री यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन 

सोलापूर, दि. 6 (प्रतिनिधी ):- सोलापूर महानगरपालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स इमारतीतील अंतर्गत सोयी-सुविधांच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. नूतनीकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन ही कामे विहित वेळेत व दर्जेदार झाली पाहिजेत, असे त्यांनी सुचित केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह अन्य मान्यवर, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत ₹2.35 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून कामाचा कालावधी 8 महिने एवढा निश्चित करण्यात आला आहे.

 

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!