पुर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थान च्यावतीने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
——————————————————–
गेली बारा ते तेरा वर्षापासून हा उपक्रम शालेय विद्यर्थ्यांकरिता यशस्वीरित्या राबवित आहेत.
——————————————————
सोलापूर ; पुर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् च्या वतीने आज रविवार दि. १४/६/२०२६/रोजी सकाळी ११ वा. गरजु गरीब होतकरु पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मंदिर समिती सदस्याच्या हस्ते वह्या चे वाटप करण्यात आले.

दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य अर्चक श्री कार्तिक स्वामी याच्या हस्ते वेदमंञोच्चारात वह्यांचे पूजन करण्यात आले.
पूर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् मध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा जयघोषात विद्यार्थी वह्या घेत होते वह्या घेतल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता.
या कार्यक्रमास मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी व पालखीसेवक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज रोजी जवळजवळ १२०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी, पालक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————–
पविन्नोत्सव कार्यक्रम
लकी ड्रॉ योजना २०२६
********************************
सालाबादप्रमाणे श्रावणमासात ५५ वे पवित्रोत्सव कार्यक्रम दि. २८/०८/२०२६ ते ०१/०९/२०२६ पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. या उत्सवासाठी पूजाकर्ता देणगीच्या माध्यमातून एकूण ६००० देणगी पावती देण्यात येईल. त्यापैकी ११०० भाग्यवान मानकरी निवडण्यात येणार आहे. निवडलेल्या भक्तांना ५ दिवस पवित्रोत्सवम् कार्यक्रम काळात १ दिवस पूजेसाठी बसविण्यात येईल. त्याकरिता इच्छुक भक्तांनी रु. २०१/- देणगी देऊन या पूजेचा लाभ घ्यावा. शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी सायं. ७.०० वाजता देणगी पावतीचे कूपन देण्यास सुरुवात झाली उत्सवमुर्ती अभिषेक पुजेला बसवण्यात येईल अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आले.











