सोलापुर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुक तयारीदरम्यान डॉल्बीवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणारे मंडळावर फौजदार चावडी पोलीस ठाणेकडुन कारवाई व २०,७०,०००/- रु. किंमतीचे डॉल्बीचे साहीत्य व वाहन जप्त.
सोलापूर (प्रतिनिधी) दि.२१/०४/२०२६ सोलापुर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक दिनांक १९/४/२०२६ रोजी असल्याने सदर मिरवणुकीमध्ये सर्व मंडळांचे अध्यक्ष व पदाधीकारी तसेच साउंड सीस्टम चालक/मालक यांना डॉल्बी सीस्टमचा वापर करु नये तसेच मोठ्या आवाजात गाणी लावु नये याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. व त्याबाबत मा. पोलीस आयुक्त सो. सोलापुर शहर यांनी डॉल्बी सीस्टीमचा वापर करण्यास मनाई आदेश दिनांक १५/४/२०२६ रोजी दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुक दिनांक १९/४/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पासुन सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी दिनांक १८/४/२०२६ रोजी रात्रीपासुन मिरवणुकीत सामील होणा-या सर्व मंडळांची वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पार्क चोक दरम्यान नंबरमध्ये लावली होती. दिनांक १९/४/२०२६ रोजी मध्य रात्री ००.३० वा सुमारास नंबरमध्ये थांबलेल्या मंडळांमध्ये सरस्वती चौक येथे आम्रपाली बहुउददेशीय सामाजीक संस्था, आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेठ, चोलापुर या मंडळाने परवानगी नसताना कार्यकर्त्यांना जमा करुन मोठ्या आवाजात डॉल्बी सीस्टीमचा वापर करुन कर्कश आवाजात हिंदी व मराठी गाणी लावली होती त्यावेळी तेथे हजर पोलीसांनी त्यांना सुचना देवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व गाणी लावली. वास्तवीक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीस दिनांक १९/४/२०२६ रोजी दुपारी १२.०० पासुन परवानगी देण्यात आली होती परंतु डॉल्बी सीस्टमचा वापर करण्यास मनाई होती.
त्याप्रमाणे आम्रपाली बहुउददेशीय सामाजीक संस्था, आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेठ, सोलापुर या मंडळावर फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं.३३०/२०२६ भा.न्या. सं. कलम २२३.२९३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१), (ई), १३५ अन्वये सदर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी नामे कपील सुरवसे. आकाश बामणे, साजन गायकवाड, आदीत्य सोनकांबळे, बाबु घागरे, अविनाश गायकवाड सर्व रा.सोलापुर व डॉल्बी सीस्टीम मालक चालक प्रेम संजय पवार रा. श्रदधा कॉलनी, पिंपरी चिंचवड पुणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर डॉल्बीचे साहीत्य त्यामध्ये
१. ०४ वेस
२. ०४ टॉप
३. ०१ मिक्सर,
४. ०२ ऍम्प्लिफायर
५. ०१ पॉवर ट्रॉली
०६. एक अशोक लेलंड दोस्त ही गाडी क्रमांक MH14MH9684
असे एकुण २०,७०,०००/- रु. किमतीचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. विजय कवाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण, व.पो.नि. श्री. महादेव राउत, पोलीस निरीक्षक श्री. तानाजी दराडे यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सपोनि / श्री. संजय क्षिरसागर, पोहया/बसवेश्वर परिट, पोहवा/जगदीश हुल्ले, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/विनोद पुजारी, पोकों/कृष्णा बहुरे, पोकों/विनायक जाधव, पोकों/रवी धेंडे, पोकों/विनोद व्हटकर, पोकों/अजय चव्हाण, पोकों/आतीश पाटील, पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकों/अमोल खरटमल, पोकों/सुरज सोनवलकर, पोकों/ सुधाकर माने, पोकों/नितीन मोरे, पोकों/ पंकज घाडगे, यांनी केलेली आहे.









