Edition

वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शभारंभ.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

 

वाखरी (ता. पंढरपूर), दि. 28 जून 2026 — मा. ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर यांच्या शुभहस्ते जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज आयुष्मान आरोग्य उपकेंद्र, वाखरी (ता. पंढरपूर) येथे उत्साहात करण्यात आला.

 

सदर प्रसंगी जिल्हाधिकारी मा. एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, सभापती, पंचायत समिती पंढरपूर डॉ. शुभम आगवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडे, डॉ. सुडके, प्रा. आ. केंद्र गाडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगावणे, सांख्यिकी अधिकारी श्री. हेमंत पवार हे उपस्थित होते.

 

तसेच परिसरातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, वाखरी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी वाखरी श्री. कोळी, वाखरी येथील सर्व आजी-माजी सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, आरोग्य कर्मचारी, पालक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पालकमंत्री महोदयांच्या हस्ते 5 वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी जिल्ह्यातील आजच्या पल्स पोलिओ मोहिमेस शुभेच्छा देत ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय मिळवू दरवेळी’ हा संदेश दिला.

 

जिल्ह्यातील 4,36,572 बालकांसाठी 6,513 लसीकरण बूथवर 7,222 कर्मचारी कार्यरत आहेत. 0 ते 5 वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमास उपस्थित पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजून मोहिमेत सहभाग नोंदवला.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!