Edition

सलमान गुलाब सय्यद सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सलमान गुलाब सय्यद सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार.

 

सोलापूर : दि.7(प्रतिनिधी) :- सोलापूर शहर जिल्हातून 2 वर्षा करिता सलमान गुलाब सय्यद, वय-२९ वर्षे, रा. जुना बोरामणी नाका, रविवार पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८, २०२०, २०२५ व २०२६ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

 

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री प्रितम यावलकर, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश जा.क्र. १४३५/२०२६ दि.०५/०६/२०२६ अन्वये, इसम नामे, सलमान गुलाब सय्यद, वय-२९ वर्षे, रा. जुना बोरामणी नाका, रविवार पेठ, सोलापूर यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!