Edition

सोलापुरात घरफोडी करणारी आंतरजिल्हा सराईत टोळी जेरबंद ; ४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापुरात घरफोडी करणारी आंतरजिल्हा सराईत टोळी जेरबंद ; ४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोकड, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ४ मे रोजी न्यू बुधवार पेठ परिसरात दोन बंद घरांची कडी-कोयंडा तोडून चोरी करण्यात आली होती. यामध्ये रोकड रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडेकर व सपोनि जे. डी. गवळे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दीपक बाळू हंगे, दत्ता अरुण कदम, आकाश सूर्यकांत आंगे आणि चालक साहेबराव लक्ष्मण बेदरे यांचा समावेश आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!