सोलापूर जिल्हा पुरवठा कार्यालयात पेट्रोल पंप व गॅस वितरकाची नियोजन बैठक.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दैनंदिन जीवनातील उपयोगात लागणारे इंधन नियोजन संदर्भात HPCL, BPCL, IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो मॅनेजर व विक्री अधिकारी यांची आढावा बैठक सोलापूर जिल्हा पुरवठा कार्यालयात आज बुधवार रोजी जिल्हयामध्ये पेट्रोल/डिझेल पुरवठा सुरळीत करणेकामी जिल्ह्यातील पेट्रोल/डिझेल वितरणाबाबत आढावा बैठक घेण्यात आले. या बैठकीस सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश देठे व HPCL, BPCL, IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो मॅनेजर व विक्री अधिकारी उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सोलापूर जिल्हयामध्ये पेट्रोल/डिझेल पुरवठा सुरळीत करणेकामी उपस्थित HPCL, BPCL. IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो मॅनेजर व विक्री अधिकारी यांना सविस्तर सूचना दिली. सोलापूर जिल्हयातील सर्व पेट्रोल/डिझेल पंपावर इंधन पुरवठा सुरळीतणे करणेकामी सर्व संबंधितांनी ग्रामीण पातळीवर आढावा घेवून इंधन पुरवठ्याबाबत सुक्ष्म नियोजन करून कोठेही इंधन तुटवडा भासणार नाही तसेच कृत्रिम इंधन तुटवडा निर्माण होणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही करणेकामी सुचित केले.
HPCL, BPCL, IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो मॅनेजर व विक्री अधिकारी यांनी सोलापूर जिल्हयाकरीता पुरेसा पेट्रोल/डिझेल इंधन साठा उपलब्ध असलेबाबत तसेच कोठेही इंधन पुरवठा कमी पडणार नाही याकरीता आवश्यक ती कार्यवाही करीत असलेबाबत सदर बैठकीमध्ये माहिती दिली.
तरी सोलापूर जिल्हयातील नागरीकांनी अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले.









