४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे भाजपाची !
६ एप्रिल १९८० भारतात सगळीकडे भाजप स्थापनेची चर्चा ! त्या काळात आम्ही सोलापुरातही भाजपा शाखा उघडण्याची वाट बघत असता, महाराष्ट्र भाजपाचे संघटन सचिव स्वर्गीय वसंतरावजी भागवत यांच्यासमवेत बसवंती मंगल कार्यालयात एकदाचे भाजपा शाखेस सुरवात झाली.
प्रभारी अध्यक्ष म्हणून रेवणसिध्द तथा बाबुरावजी भोगडे यांची नियुक्ती झाल्याचे स्व. वसंतराव भागवतानी जाहीर केले ! तद्नंतर सदस्य नोंदणीस सुरवात झाली आणि ऑक्टोबर १९८० रोजी लोकशाही मानि शहर भाजपा अध्यक्षपदाची घोषणा झाली. .अॅड गजानन बसय्या हंपी आणि रविंद्र रामकृष्ण राळेरासकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी अधिकृत अर्ज दाखल केले. अॅड. राचेटी वकिलांच्या मध्यस्थीनंतर रविंद्र राळेरासकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. अॅड. गजानन हंपी यांची अधिकृतपणे भाजपा शहराध्यक्षपदी निवड जाहीर झाली.
शहराध्यक्षपदी निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर सोलापूर शहराची – पदाधिकारी व कार्यकारणी अॅड. हंपी वकिलानी जाहीर केली. त्यामध्ये शामलालजी त्रिपाठी उपाध्यक्ष, गोवर्धनदासजी भुतडा, कोषाध्यक्ष बालकृषण शिंपाळे गुरुजी, सराचटणीस तर लिंगराज
वल्याळ, सोमेश्वर पसारे, बाशाभाई शेख यांची शहर चिटणीसपदी नियुक्ती जाहीर केली. सन १९८० भाजपा स्थापनेपासून शहर कार्यालय मिळेपर्यंत म्हणजेच दुसरे अध्यक्ष नानासाहेब आराध्ये हे १९८४ साली अध्यक्ष झाले. त्यावेळी सरस्वती चौकाजवळ ३ ऱ्या मजल्यावर कार्यालय मिळाले. नानासाहेब आराध्ये यांच्या अध्यक्ष काळात १९८५ साली म.न.पा.मध्ये पुलोद म्हणून लढविलेल्या निवडणुकीत ११ नगरसेवक निवडून येऊन लिंगराज वल्याळ यांच्या रुपाने मनपा सत्तेत सहभाग मि ळाला. त्यानंतर या वर्षात १९८६ साली किशोरजी देशपांडे यांच्या रुपाने शहराचे महापौरपदही मि ळाले. तर १९८५ सालीच पुलोदच्या सहाय्याने शहर उत्तरची विधानसभेत रविंद राळेरासकर यांना उमेदवारी देऊन जिद्दीने विजयाच्याजवळ पोहचलो पण, अपयश आले.
इथपर्यंतचा प्रवासही सहज नव्हताच । १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अख्ख्या भारतातून केवळ
BJP
सन १९८० ते १९९० पर्यंत शहा चिटणीसपदासह कार्यालयाची जबाबदारीही माझ्याकडेच होती. सन १९९० पासून श्रीहरी मॅकल हे कार्यालय प्रमुख झाले.
सन १९८४ ची लोकसभा (उमेदवार अॅड. राचेटी वकील) सन १९८५ म. न.पा. निवडणूक असो १९८५ विधानसभा (उमेदवार रविंद्र राळेरासकर) सन १९८९ (उमेदवार लिंगराजजी वल्याळ) सन १९९१ लोकसभा (उमेदवार गोपीकिसन भुतडा) या सर्व निवडणुकीच्या कार्यालयाची जबाबदारीही माझ्याकडेच होती. सन १९९० पासूनची शहर भाजपाची वाटचाल ही फारच
२ खासदारच निवडून आले. आमच्या गळ्याचे ताईत असलेले आमचे खरे हिरो अटलबिहारी वाजपेयी यांचा पराजय पचवणे आम्हास अतिशय अवघड झाले. असे असूनही क्या हार में क्या जीत में ही अटलजींचे प्रेरणा देणाऱ्या भाषणाने आम्ही परत जिद्दीने पेटून उठलो आणि परत काँग्रेस सत्तेच्या विरोधात संघर्ष करीत पुढे चाललो न थकता.
कठीण होती. अॅड. हंपी, अॅड. राचेटी, बाबूराव भोगडे, गोवर्धनदास भुतडा, डॉ.प.गो. वळसंगकर, जनसंघाचे म ाजी नगरसेवक वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले. माझे भाग्य म्हणजे मला राज्यातील अनेक नेत्याबरोबर तसेच सन १९८० ते २०२६ पर्यंतच्या सर्व अध्यक्षाबरोबर म्हणजेच अॅड. हंपी, नानासाहेब आराध्ये, लिंगराज वल्याळ, किशोर देशपांडे, नरसिंग मॅगजी, कर्नल प्रभाकर लांडगे, गोपी किसन भुतडा, रामचंद्र जन्नू, विजयकुमार देशमुख, अशोक निंबर्गी, विलास देशमुख, नरेंद्र काळे
ते विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई देशमुख यांसमवेत भाजपाचा कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली. त्यातही मी भाजपा संस्थापक चिटणीस म्हणून जो मान-सन्मान मिळाला यामध्येच मी माझे भाग्य समजतो!’ आज पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काही व्यवस्था बदलत असल्या तरी भारतीय जनता पक्षाचा मूलभूत मूलभ विचार राष्ट्रहित, सर्वसमावेशक विकास आणि जनसेवा यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही सर्वजण वैचारिकदृष्ट्या बांधील आहोत आणि त्या विचारांचा अभिमान बाळगतो.

बाशाभाई शेख
ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ता









