Edition

काँग्रेसची खिल्ली पण बिनविरोध साठी विरोधकांना बोलणार ; सोलापुरात पालकमंत्र्यांचे प्रयत्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसची खिल्ली पण बिनविरोध साठी विरोधकांना बोलणार ; सोलापुरात पालकमंत्र्यांचे प्रयत्न.

सोलापूर : सोलापूर विधान परिषदेसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाले सर्वांचे लक्ष लागलेल्या भारतीय जनता पार्टी करून माजी आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी दाखल झाली. भारतीय जनता पार्टीने शक्तिप्रदर्शन करून ही उमेदवारी दाखल केली.

पालकमंत्री जयकुमार गोरे माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजन पाटील माढाचे नेते रणजितसिंह शिंदे, दीपक साळुंखे, प्रदेश नेते शहाजी पवार, महापौर विनायक कोंड्याला जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती चेतनसिंह केदार शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच आमदारांना सोबत घेण्यात आले होते. त्यामध्ये सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचीही उपस्थिती जाणवली.

भारतीय जनता पार्टीकडे एकूण मतदानाच्या 50% पेक्षा अधिक मते असून महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे जर एकत्रित मतांची संख्या पाहिली असता महायुती या निवडणुकीत प्रचंड मजबूत दिसून येते.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आज असलेल्या इतर आमदारांची उपस्थिती पाहता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. ते म्हणाले, मला एकाचा फोन आला काँग्रेसच्या उमेदवाराला दोन सुचक कमी पडले पण आम्ही म्हटले करून टाका काही अडचण नाही.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी वेळप्रसंगी आपण विरोधकांना नाही बोलू, विनंती ही करू कारण सोलापूर ने बिनविरोधचा आदर्श घालून द्यावा असेही जयकुमार गोरे बोलून गेले.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!