Edition

जिल्हा परिषद नंबर 1 पतसंस्थेच्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली तर व्हा. चेअरमनपदी चेतन वाघमारे यांची निवड.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद नंबर 1 पतसंस्थेच्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली तर व्हा. चेअरमनपदी चेतन वाघमारे यांची निवड

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नं. १ सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी दक्षिण सोलापूर येथील तजमुल अब्दुल जलील मुतवल्ली यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा. चेअरमनपदी चेतन अनिल वाघमारे यांची बिनविरोध निवड करणेत आली. सदर सभा सहाय्यक उपनिबंधक डी.एस. भवर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

माजी चेअरमन श्वेतांबरी राऊत व माजी व्हा. चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी सर्व संचालकांनी वेळोवेळी सहकार्य केलेमुळे चांगल्या प्रकारे व मनमोकळे कामकाज करता आल्याचे या प्रसंगी सुचित केले. नुतन चेअरमन तजमुल मुतवल्ली यांनी सर्वाच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे करू असे आश्वासन दिले. व्हा. चेअरमन चेतन वाघमारे यांनी सर्वांच्या सुचनेप्रमाणे व सर्वांचे सहकार्याने काम करून संस्थेची प्रगती करू असे मत व्यक्त केले.

संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक श्रीशैल देशमुख यांनी माजी चेअरमन श्रीमती श्वेतांबरी राऊत यांच्या प्रमाणे नियमानुसार काम करणेच्या सुचना नुतन चेअरमन व्हा. चेअरमन यांना दिल्या. माजी व्हा. चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले.

नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांना त्याच्या कारकिर्दीस ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही आर गरड, प्रकाश शेटे, अशोक भोसले, व्हि डि नवले, पंडित भोसले, श्रीशैल देशमुख ,दयानंद परिचारक, यांचेकडुन शुभेच्छा देणेत आल्या. सदर सभेस सेवाजेष्ठ संचालक डॉ. एस पी माने, संचालक कुंभार एस. एन, एस. आर. तांबोळी ,व्ही. एम. घेरडे, व्ही. व्ही. घोगरे , व्ही. बी. पाटील, जी. एम. मारडकर. एस. एच. राठोड के, जी. लालबोन्द्रे, एस. डी. म्हमाने, व्ही. के. शिंदे, आर. आर. घुले, सौ.एम. एस. शिंदे,, तज्ञ् संचालक : पी व्ही नवले,के एन खुर्द स्विकृत सदस्य सचिव डी. एल. देशपांडे कर्मचारी सुभाष काळे, विनोद कदम आदी उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!