Edition

“ए बी पी माझा” चे ज्येष्ठ पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर चुकीचे गुन्हा दाखल, सोलापूर पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या चुकीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. एस कार्तिकेयन यांना सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

एबीपी माझा’चे ज्येष्ठ पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी एनएसयूआय (NSUI) आणि काँग्रेसच्या सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या एफआयआरमध्ये पत्रकार मंदार गोंजारी यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ मोहिमेअंतर्गत पुण्यातील COEP कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या आणि राड्यासंदर्भात वार्तांकन सुरू होते. तेथे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रतिक्रिया घेतल्यामुळे आणि बातमी प्रसिद्ध केल्यामुळे COEP प्रशासनाने आक्षेप घेतला.केवळ आपले व्यावसायिक कर्तव्य बजावत असताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना पत्रकारावर गुन्हा दाखल केल्यामुळे चुकीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. एस कार्तिकेयन यांना सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सोलापुरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!