Edition

महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मातोश्री भवनात रक्षाबंधन साजरी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मातोश्री भवनात रक्षाबंधन साजरी.

सोलापुर (प्रतिनिधी) दि.२८/८/२०२६. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मुंबई येथील मातोश्री बंगल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.

       मातोश्री बंगल्यात झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात बिडी कामगार सेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर मा.साहेब व बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बिडी कामगार सेनेचे रेखा म्हंता यांनी मा. उद्धव साहेबांना राखी बांधले यावेळी उद्धव साहेबांनी बिडी उद्योगात चाललेल्या अस्थिर परिस्थितीची चौकशी करून बिडी उद्योग टिकण्यासाठी व कामगार जगण्यासाठी आणि बिडी कामगारांना किमान वेतन हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले.

     शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार सेनेचे प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज)यांच्या उपस्थितीत झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल कुराडकर,रेखाताई आडकी, साक्षी आळगी, प्रीती आडकी,प्रेम आडकी, प्रथमेश आडकी यांच्यासह आदि उपस्थित होते.


महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मुंबई येथील मातोश्री बंगल्यात मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना रक्षाबंधन करताना रेखा ताई आडकी.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!